रोहित शर्मा मोडणार ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड

11 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवटचा सामना भारत नेदरलँड यांच्यात होणार आहे. 

नेदरलँडला पराभूत करताच टीम इंडिया साखळी फेरीत सर्वाच्या सर्व सामने जिंकणारा पहिला संघ ठरेल.

नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

ख्रिस गेलचा वर्ल्डकपमधील षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. 

रोहित शर्माने वनडे वर्ल्डकप 2023 मधील 8 सामन्यात 22 षटकार ठोकले आहेत.

नेदरलँड विरुद्ध पाच षटकार ठोकताच तो ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढेल.

ख्रिस गेलने 2015 वर्ल्डकपमध्ये एकूण 26 षटकार मारले आहेत.