दक्षिण आफ्रिकेचा नादच नाय, कांगारुंचा माज उतरवला, 2016 पासूनचा दबदबा कायम

22 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

दक्षिण आफ्रेकेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला आहे.  दक्षिण  आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये धुव्वा उडवला आहे. 

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडे मॅचमध्ये 84 रन्सने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सलग पाचवा एकदिवसीय मालिका विजय ठरला आहे. 

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 2016 मध्ये 5-0, 2018 साली 2-1, 2019 मध्ये 3-0, 2023 साली 3-2 अशा फरकाने पराभूत केलं होतं. 

तसेच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या 10 पैकी 8 एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरूद्ध गेल्या 21 पैकी 17 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

तसेच ऑस्ट्रेलिया मायदेशात गेल्या सलग 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 चा आकडाही गाठू शकली नाहीय.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय