सचिन..सचिन..जयघोष मैदानात पुन्हा गुंजणार, मास्टर ब्लास्टर मैदानात उतरणार
1 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
मास्टर ब्लास्टर्स सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची अनेकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.
सचिन तेंडुलकर या वर्षी तीन ठिकाी होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भाग घेणार आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये सहा संघ आहेत. हे सामने मुंबई, लखनौ आणि रायपूरमध्ये होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, चाहते आता टी20 क्रिकेट पसंत करतात आणि त्यांना जुनी लढाई पुन्हा पाहायला आवडेल.
सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर रोड सेफ्टी स्पर्धेत इंडिया लीजेंड्सकडून खेळला आहे.
सचिन तेंडुलकर सध्या 51 वर्षांचा आहे. 200 कसोटी, 463 वनडे, 1 टी20 आणि 78 आयपीएल सामने खेळला आहे.