धोनी-धवन-रैनाच्या पुढे निघून जाणार संजू सॅमसन? कसं काय ते समजून घ्या

7 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघात संजू सॅमसनची निवड झाली आहे. त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. 

संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. याचं उत्तर 10 सप्टेंबरला नाणेफेकीनंतरच मिळेल. 

सॅमसनला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली तर फलंदाजीत कमाल करू शकतो. चौकार आणि षटकारांचा वर्षाव करू शकतो. 

संजू सॅमसन या स्पर्धेत तीन दिग्गज खेळाडूंना मागे टाकू शकतो. यात एमएस धोनी, सुरेश रैना आणि शिखर धवनचा विक्रम मोडू शकतो. 

संजू सॅमसनने या स्पर्धेत 10 षटकार मारले तर भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूत आठव्या स्थानी येईल. 

सॅमसनच्या नावावर आतापर्यंत 42 सामन्यातील 38 डावात 49 षटकार आहेत. एक षटकार मारताच अर्धशतक पूर्ण करेल.

सॅमसनच्या पुढे धवन असून त्याने 50 षटकार आहेत. धोनीने 52 आणि रैनाने 58 षटकार मारले आहे. या यादीत टॉपला रोहित शर्मा असून त्याने 205 षटकार मारलेत. 

आशिया कप स्पर्धेपूर्वी गोलंदाजाने रचला इतिहास, केलं असं की...