8 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय क्रिकेट चाहत्यांना संजू सॅमसनकडून आशिया कप 2025 स्पर्धेत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
तसेच संजू सॅमसन याला पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर 10 तारखेला मिळेल.
संजूने गेल्या काही महिन्यांध्ये सातत्याने टी 20i क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे संजूकडून मोठी खेळीची अधिक आशा आहे.
संजू सॅमसनला आशिया कप स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि शिखर धवन या 3 माजी दिग्गजांनाना मागे टाकण्याची संधी आहे.
संजूने आशिया कप 2025 स्पर्धेत 10 सिक्स लगावल्यास तो टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा आठवा फलंदाज ठरेल.
संजूने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 42 सामन्यांमधील एकूण 38 डावांत 49 षटकार लगावले आहेत. त्यामुळे संजूला 50 सिक्स पूर्ण करण्याची संधी आहे.
धवनने टी20i क्रिकेटमध्ये 50, धोनीने 52 आणि रैनाने 58 षटकार लगावले होते. तर या यादीत रोहित शर्मा 205 सिक्ससह पहिल्या स्थानी विराजमान आहे.