शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी
15 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात आक्रमक खेळी केली. तसेच शतक ठोकलं. आता त्याला कर्णधारपद मिळालं आहे.
संजू सॅमसनला केरळ संघाचं कर्णधारपद सोपवलंगेलं आहे. आता रणजी स्पर्धेत संघाची कमान सांभाळणार आहे.
संजू सॅमसन पहिल्या सामन्यात खेळला नाही. कारण बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळत होता. आता कर्नाटकविरुद्ध कर्णधारपद भूषवणार आहे.
संजू सॅमसन मागच्या रणजी पर्वात फेल गेला होता. चार सामन्यात त्याने 35.40 च्या सरासरीने 177 धावा केल्या होत्या.
संजू सॅमसनला सूर गवसला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटच्या टी20 47 चेंडूत 111 धावा केल्या.
सॅमसन आता रणजी ट्रॉफीत खेळणार आहे. याच तयारीवर आता दक्षिण अफ्रिका दौऱ्याची तयारी करेल.
टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यात 4 टी20 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.