2 एप्रिल, दुपारी 3 वाजून 53 मिनिटं, सारा तेंडुलकरबाबत चाहत्यांना गूड न्यूज
2 April 2025
Created By: Sanjay Patil
सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर एक्टीव्ह असते
सारा तेंडुलकरचं मुंबई आणि क्रिकेटसह असलेलं कनेक्शन जगजाहीर आहे
सारालाही वडील सचिन तेंडुलकरप्रमाणे क्रिकेटबाबत जिव्हाळा आणि प्रेम
सारा अनेकदा स्टेडियममध्ये टीम इंडियाला आणि आयपीएलदरम्यान मुंबई टीमला सपोर्ट करताना दिसली आहे
मात्र आता सारा एक चाहती राहिली नाही, सारा एका टीमची मालकीण झाली आहे
ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग या एक्स अकाउंटवरुन
2 एप्रिलला, दुपारी 3 वाजून 53 मिनिटांनी याबाबत माहिती देण्यात आली
सारा ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेतील मुंबई टीमची मालकीण झाली आहे
ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात साराची टीम मैदानात उतरणार
क्रिकेट माझ्या कुटुंबातील महत्त्वाचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया साराने दिली