भारतीय संघाचं 8 वर्षानंतर पाकिस्तानसमोर पुन्हा तसंच घडलं
6 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे.
भारत पाकिस्तान सामन्यात 2016 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. जवळपास तसंच काहीसं या सामन्यात घडलं.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. तसेच 20 षटकात 8 गडी गमवून 105 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने धीमी सुरुवात केली. भारताने पहिल्या सहा षटकात फक्त 25 धावा केल्या.
टीम इंडियाने पहिल्या सहा षटकात एकही चौकार मारला नाही. वर्ल्डकप इतिहासात भारताची अशी दुसरी वेळ आहे.
स्मृती मंधाना पुन्हा एकदा फेल गेली. ती 16 चेंडूत फक्त 7 धावा करू शकली.
2016 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचा संघ समोर होतं. त्यावेळेस पॉवर प्लेमध्ये चौकार मारता आला नाही.