बाबर आझमने कर्णधारपद सोडलं, पीसीबीकडून नव्या नावाची घोषणा

15 November 2023

Created By: Rakesh Thakur

बाबर आझमने तिन्ही फॉर्मेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी राहीली.

पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली नाही. तसेच कामगिरी सुमार राहिली.

बाबर आझम या स्पर्धेत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

पीसीबीने टी20 आणि टेस्टसाठी नव्या कर्णधारांची घोषणा केली आहे. 

टी20 संघाची धुरा शाहीन आफ्रिदीकडे देण्यात आली आहे.

कसोटी संघाची धुरा शान मसूद याच्याकडे देण्यात आली आहे.