9 मार्च 2025

श्रेयस अय्यरने 243 धावा करत रचला इतिहास

श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 48 धावा केल्या. 

अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच विराट कोहलीला मागे टाकलं. 

श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉपी 2025 स्पर्धेत 243 धावा करत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सहा सामन्यात 243 धावा केल्या. रचिन रवींद्रनंतर टॉप फलंदाज राहिला. 

श्रेयस अय्यरला मागच्या वर्षी सेंट्रल काँट्रॅक्ट यादीतून वगळलं होतं. पण त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. 

श्रेयस अय्यरने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही 530 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 66 पेक्षा अधिक होती.

श्रेयस अय्यरला या कामगिरीसाठी मोठं बक्षिस मिळणार आहे. त्याला पुन्हा एकदा सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये स्थान मिळणार आहे.