टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने कपड्यांचा नवा बिझनेस सुरु केला आहे.
अय्यरने नव्या फॅशन कलेक्शनसाठी भारतीय स्ट्रीटवियर कंपनी HUEMN सोबत भागीदारी केली आहे.
अय्यरने HUEMN सोबत 15 मार्चला आपलं नवं कलेक्शन लाँच केलं. यात टीशर्ट, शर्ट आणि बॉटमचे 15 पीस आहेत.
या कलेक्शनमध्ये खास म्हणजे हाताने पेंट केलेली मड क्रू नेक टीशर्ट आहे. यावर थ्रीडी प्रिंटेड लोगो आहे. याच पद्धतीची एक डेनिम पँटही आहे. यासाठी 7 वेळा धुण्याची प्रक्रिया करावी लागली.
या कपड्यांची किंमत 3995 रुपयांपासून सुरु होते आणि 18500 रुपयांपर्यंत आहे. यात हाताने रंगवलेल्या टीशर्टची किंमत 6500 आणि पँटची किंमत 18500 रुपये आहे.
कलेक्शन लाँच करताना श्रेयस अय्यरने विराट कोहलीच्या फॅशनची प्रशंसा केली आणि सर्वोत्तम ड्रेस्ड क्रिकेट असल्याचं सांगितलं.
आयपीएल 2025 स्पर्धेत श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे.