एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकं करणारे 3 भारतीय, शुबमन कितव्या स्थानी?
27 जुलै 2025
Created By: संजय पाटील
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि फलंदाज शुबमन गिल याने मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं.
शुबमनचं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील हे चौथं शतक ठरलं.
शुबमन एका मालिकेत सर्वाधिक 4 शतकं करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
शुबमनने एजबेस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध 1 द्विशतक आणि 1 शतक ठोकलं होतं.
तसेच शुबमनने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत 147 धावा केल्या होत्या.
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही एका मालिकेत 4 शतकं लगावली होती.
सुनील गावसकर यांनी 1971 साली वेस्टइंडिज विरुद्ध एका मालिकेत 4 शतकं ठोकली होती.
गावसकर यांनी 1978-1979 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध 4 शतकं झळकावली होती.
भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याने 2014-2015 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी मालिकेत 4 शतकं झळकावली होती.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा