शुबमनला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी आयसीसीकडून गूड न्यूज
7 मार्च 2025
टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यात 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल महामुकाबला
या अंतिम सामन्यात उपकर्णधार शुबमनकडे सर्वांचं लक्ष असणार, गिलकडून मोठ्या खेळीची आशा असणार
शुबमनला फायनलआधी आयसीसीकडून गूड न्यूज मिळालीय, शुबमनचा आनंद द्विगुणित होऊ शकतो
शुबमनला आयसीसीकडून फेब्रुवारीतील कामगिरीमुळे 'प्लेअर ऑफ द मन्थ' पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय
शुबमनने फेब्रुवारीत 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 101.50 च्या सरासरीने 2 शतकं आणि 2 अर्धशतकांसह 406 धावा केल्या
शुबमनने या 2 मधील एक शतक हे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झळकावलं
तसेच शुबमनव्यतिरिक्त स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनाही आयसीसीने नामांकन दिलंय