9 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
फोटो- बीसीसीआय
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलची इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी होती.
शुबमन गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पाच सामन्यांमध्ये 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या.
कसोटी मालिकेदरम्यान त्याने एका विशेष बाबतीत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटला मागे टाकले आणि दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
डकेटने 2025 या वर्षातील 27 डावांमध्ये 1290 धावा केल्या आहेत. गिलने 20 डावांमध्ये 1234 धावा केल्या आहेत. जो रूटने 19 डावांमध्ये 1175 धावा केल्या आहेत.
गिल सध्या बेन डकेटपेक्षा 57 धावांनी मागे आहे. आशिया कप 2025 स्पर्धेत शुभमन गिलला संधी मिळाली तर तो बेन डकेटला मागे टाकेल.
शुबमन गिल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. यात त्याने पाच सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 188 धावा केल्या होत्या.
गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 754 धावा करून रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीला मागे टाकले. गिलने इंग्लंडविरुद्ध एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत.