श्रीलंकेच्या या फलंदाजाला तोडच नाही! जितके सामने तितक्याच 50 प्लस धावा
19 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
श्रीलंका मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे
श्रीलंकेचा एक फलंदाज सातत्याने प्रत्येक सामन्यात 50 प्लस धावा करतोय
कामिंदू मेंडीसचं 2022 मध्ये पदार्पण, त्यानंतर ते आतापर्यंत मेंडीस प्रत्येक सामन्यात 50+ धावा करतोय
कामिंदूने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 50 प्लस धावा केल्या
कामिंदुने याआधीच्या 6 सामन्यांमधील डावात अर्धशतक किंवा शतक केलंय
कामिंदुने 7 कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत 3 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत
कामिंदूने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केलीय, मात्र इतर फॉर्मेटमध्ये तसं नाही