स्मृती मंधानाला विराट कोहलीकडून मिळाला यशाचा मंत्र
8 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मंधाना ही दिग्गज फलंदाज म्हणून गणली जाते.
डावखुऱ्या स्मृती मंधानामध्ये सामना पालटण्याची ताकद आहेत.
स्मृती मंधानाच्या या यशात विराट कोहलीचा हात आहे, असं म्हंटलं वावगं ठरणार नाही.
विराट कोहली हा स्मृती मंधानाचा आवडता फलंदाज आहे. असं तिने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे.
एका मुलाखतीत स्मृती मंधानाने सांगितलं की, यशाचा मंत्र विराट कोहलीकडून मिळाला आहे.
विराटकडून कायम संघाचं हित पहिलं जपलं पाहिजे हे शिकायला मिळालं, असं स्मृती म्हणाली.
स्मृती मंधाना आणि विराट कोहलीमधील साम्य म्हणजे दोघंही 18 नंबरची जर्सी घालून टीम इंडियासाठी खेळतात.