टी20 वर्ल्डकप खेळलेल्या खेळाडूला पाच वर्षांचा तुरुंगवास

29 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

1 जूनपासून वेस्ट इंडिज अमेरिकेत टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत चांगल्या कामगिरीसाठी खेळाडू सज्ज आहेत. 

मागच्या 17 वर्षात अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. यात एक खेळाडू असा आहे की त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हा दक्षिण अफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू गुलाम बोदी आहे. 2007 मध्ये टी20 वर्ल्डकप खेळला होता. 

भारतीय वंशाच्या बोदी लहानपणापासूनच दक्षिण आफ्रिकेत राहिला. देशांतर्गत क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला संधी मिळाली.

त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फक्त 2 एकदिवसीय आणि 1 टी20 सामन्यापर्यंत टिकली. त्याने एकूण 91 धावा केल्या. मात्र चुकीच्या कारणामुळे चर्चेत राहिला. 

2016 मध्ये दक्षिण अफ्रिकेने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. त्यात दोषी आढळल्याने 20 वर्षांची बंदी घालण्यात आली. 

2018 मध्ये बोदीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याच्या 15 वर्षाच्या तुरुंगवासाचं सावट होतं. मात्र 2019 मध्ये न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा कारवास सुनावला.