वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी दक्षिण अफ्रिकेची खास जर्सी, पाच जणांची मिळणार साथ
4 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात स्पर्धेतील तिसरा सामना होत आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकन संघ खास जर्सी परिधान घालून उतरला आहे.
दक्षिण अफ्रिकेचा संघ एका खास कॉलरसह मैदानात उतरला आहे. या कॉलरवर काही खास लिहिलं आहे.
जर्सीवर खेळाडूंच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची नाव आहेत. ही जर्सी परिधान करून खेळाडू मैदानात उतरले आहेत.
प्रत्येक खेळाडूला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच जवळच्या व्यक्तींची नाव लिहिण्यास सांगितलं आहे. ज्यांचा आयुष्यात खास वाटा आहे.
या जर्सीमुळे खेळाडू स्वत: एकटं समजणार नाहीक. तसेच जवळच्या व्यक्तींना सन्मान देत असल्याची भावना असेल. त्याचबरोबर जेतेपदासाठी प्रोत्साहित होतील.
पुढे जा.. स्वत:साठी.. त्यांच्यासाठी.. प्रत्येकासाठी.. दक्षिण अफ्रिकेसाठी.. आणि प्रोटीजसाठी या संदेशासह उतरली आहे.