नितीश रेड्डीमुळे वाढलं काव्या मारनचं टेन्शन! का ते जाणून घ्या
11 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
नितीश रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली असून आपली छाप पाडली आहे.
नितीशने दुसऱ्याच टी20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करत 34 चेंडूत 74 धावा केल्या.
नितीशच्या खेळीने भारतीय फॅन्स खूश असताना आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन टेन्शनमध्ये आली आहे.
नितीश मारनचा खेळ पाहून काव्या मारन यांचं टेन्शन आता डबल झालं आहे. त्याचं कारण आयपीएल मेगा ऑक्शन आहे.
नितीश आता कॅप्ड प्लेयर झाला आहे. त्यामुळे त्याला कमी किंमतीत रिटेन करण्याचा पर्याय काव्या मारनच्या हातून गेला आहे.
नितीशची विस्फोटक फलंदाजी पाहून त्याला मोठी रक्कम मोजून रिटेन करावंलागेल. पण त्याच्या हैदराबाद कोणाला वगळणार? हा प्रश्न आहे.
हैदराबादकडे ट्रेव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, पॅट कमिन्स आणि अभिषेक शर्मा आहेत. त्यामुळे यांची रिटेन वॅल्यू जास्त असेल. त्यामुळे काव्या मारन यांच्यापुढे पेच वाढला आहे.