26 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
शाकिब कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत एंटीगा टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. शाकिबने या स्पर्धेत रविवारी 24 ऑगस्टला मोठी कामगिरी केली.
शाकिबने सेंट किट्स विरुद्ध 11 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या आणि टीमला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली.
शाकिबने यासह टी 20 कारकीर्दीत मोठी कामगिरी केली. शाकिबने 500 विकेट्स पूर्ण केल्या.
शाकिब अल हसन याने टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स आणि 7 हजार धावाही केल्या आहेत.
शाकिब टी 20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्स आणि 7 हजार धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
तसेच शाकिबने आतापर्यंत 71 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार 609 धावा केल्या आहेत. शाकिबने या दरम्यान 5 शतकं झळकावली आहेत.
शाकिबने वनडेत 7570 आणि टी 20I मध्ये 2551 धावा केल्या आहेत. तसेच शाकिबने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मध्ये अनुक्रमे 246, 317 आणि 149 विकेट्स घेतल्या आहेत.