2 मार्च 2025

सुनील गावस्कर हॉटेलमधील टॉवेलचं काय करायचे?

लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आहेत. 

70 आणि 80 दशकात सुनील गावस्कर यांचा नावलौकिक होता. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीचा ते सक्षमपणे सामना करायचे.

पण लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे हॉटेलच्या टॉवेलचं काय करायचे माहिती आहे का? 

सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट्स सेंट्रल ऑफ पाकिस्तान नावाच्या यूट्यूब चॅनेलवरील शोमध्ये याचा खुलासा केला आहे. 

जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा थायपॅड नावाचा प्रकार नव्हता. म्हणून हॉटेलचे टॉवेल कंबरेला खोचून थायपॅडसारखा वापर करायचो. 

गावस्कर यांनी सांगितलं की, जेव्हा खेळायचो तेव्हा हेल्मेटही नव्हतं. यामुळे हेल्मेट घालायचो नाही. 

सुनील गावस्कर यांनी भारतासाठी 125 कसोटीत 10122 धावा केल्या आहेत. तसेच 108 वनडे सामन्यात 3092 धावा केल्या आहेत.