सूर्यकुमार यादवचा रोहित शर्माला धोबीपछाड, 2500 धावा केल्या पूर्ण
12 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने कहर केला.
सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यात त्याने 5 षटकार आणि 8 चौकार मारले.
कर्णधार सूर्यकुमार यादवने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण केल्या.
सूर्यकुमारने 71 डावात ही धावसंख्या करत रोहित शर्माला मागे टाकले. रोहित शर्माला 92 डाव लागले होते. विराटने 68 डावात ही 2500 धावांचा पल्ला गाठला.
संजू सॅमसनने 46 चेंडूत 111 धावा केल्या. तर सूर्यकुमारसोबत 70 धावात 173 धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ण सदस्य संघांमध्ये सर्वाधिक धावसंख्या केली. भारताने 20 षटकात 297 धावा केल्या.