कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय,11 महिन्यांचा दुष्काळ संपवणार का?

10 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ युएई विरुद्ध आपला आपला पहिला सामना खेळत मोहिमेची सुरुवात करेल.

या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरूद्धच्या मालिकेनंतर भारताने एकही टी20 सामना खेळलेला नाही. सूर्यकुमारने या पाच सामन्यांच्या मालिकेत 28 धावा केल्या. दोन सामन्यांमध्ये खातेही उघडू शकला नाही.

भारतीय संघ सात महिन्यांनंतर टी20 सामना खेळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा कर्णधार सूर्यकुमार यादववर टीकून आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.

टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनसह इतर फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी केली आहे. पण सूर्यकुमारची बॅट शांत राहिली आहे.

सूर्यकुमार यादवने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक 11 महिन्यांपूर्वी झळकावलं होतं. ऑक्टोबर 2025 मध्ये बांगलादेश विरुद्ध 75 धावांच्या खेळीनंतर, भारतीय कर्णधाराने 8 डावांमध्ये फक्त 54 धावा केल्या आहेत.

पाच डावांमध्ये दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 होती. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गकेबेहारा येथे धावा केल्या होत्या.

सूर्यकुमार यादवने 2025 च्या आयपीएलध्ये चांगली कामगिरी केली. त्याने 16 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 65.18 च्या सरासरीने आणि 167.92 च्या स्ट्राईक रेटने 717 धावा केल्या.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा