19 मार्च 2025

सूर्यकुमार यादवने तिलक वर्माची तुलना केली गाढवाशी!

सूर्यकुमार यादव मागच्या काही दिवसांपासून लग्न समारंभात हजेरी लावत आहे. 

आयपीएल स्पर्धेच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीसोबत जोडला गेला आहे. 

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येताच सूर्यकुमार यादवने इंट्रा-स्क्व़ॉड सामना खेळला. यात तिलक वर्माने त्याची विकेट काढली. 

तिलक वर्माने त्याची विकेट काढताच त्याने त्याची तुलना गाढवाशी केली. पण ही इंस्टास्टोरी मस्करीत केली आहे.

सूर्यकुमार यादावने कायरन पोलार्डसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिलं की, 13 वर्षांचं मैत्री आणखी मजबूत झाली आहे. 

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पण मुंबईचा सामना 23 मार्चला चेन्नईशी होणार आहे. 

सूर्यकुमार यादवकडे भारताचं कर्णधारपद आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.