सूर्यकुमार T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

25 November 2023

Created By: Rakesh Thakur

दुसरा टी20 सामना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खास आहे.

सूर्यकुमार यादव याने मोठी खेळी केली तर टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचेल.

टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 79 धावा दूर आहे. 

51 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने आणि 173.37 च्या स्ट्राईक रेटने 1921 धावा केल्या आहेत.

T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.

सूर्याकडे सर्वात जलद 2000 T20 धावा करण्यासाठी अजून 4 डाव आहेत.

कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 56 डाव खेळले.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर जलद 2000 हजार धावा करण्याचा विक्रम आहे.

दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 52 डावात ही कामगिरी केली. सूर्याला यात स्थान मिळवण्यासाठी एकच शिल्लक डाव आहे.