ऑलिम्पिकमध्ये बास्केटबॉल आणि नंतर क्रिकेटमध्ये कर्णधारपद आणि ठोकल्या इतक्या धावा
16 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
जगभरातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन खेळात प्रावीण्य दाखवलं आहे. अशाच खेळाडूंच्या यादीत सूजी बेट्स आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाची दिग्गज ओपनर आणि माजी कर्णधार सूजी बेट्स 16 सप्टेंबरला 37 वर्षांची झाली आहे.
सूजी बेट्सने दोन मोठ्या भावांसह क्रिकेट खेळाला सुरुवात केली होती. 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं.
क्रिकेटसह ती बास्केटबॉलही खेळत होती. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये न्यूझीलंड संघात होती.
2011 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाची कर्णधार झाली. त्यानंतर पूर्णपणे क्रिकेटमध्ये रमली आणि संघाला स्मरणात राहतील असे विजय मिळवून दिले.
सूजीच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. 162 सामन्यात 4348 धावा केल्या. यात 1 शतक आणि 28 अर्धशतकं आहेत.
163 वनडे सामन्यात 13 शतकं असून 5718 धावा केल्या आहेत. जागतिक क्रमवारीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. वनडेत तिने 78, तर टी20 58 विकेट घेतल्यात.