चौकार षटकारांसह सूर्यकुमारचा तो रेकॉर्ड आता ऋतुराजच्या नावावर
30 November 2023
Created By: Rakesh Thakur
टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
टी 20I मध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तो दुसरा फलंदाज ठरला आणि विराट कोहलीला मागे टाकले.
सूर्यकुमार यादवचा एक विक्रम मोडण्यात ऋतुराज गायकवाडला यश आलं आहे.
ऋतुराजने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली आणि त्याने 7 षटकार आणि 13 चौकार लगावले.
ऋतुराजने खेळलेल्या या नाबाद शतकी खेळीमध्ये त्याने चौकार षटकाराच्या मदतीने 94 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने याआधी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात चौकार षटकाराच्या मदतीने 92 धावा केल्या होत्या.
या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी असून श्रीलंकेविरुद्ध चौकार षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या होत्या.