हार्दिक पांड्याला संघात घेणं मुंबई इंडियन्सला महागात पडणार!

28 November 2023

Created By: Rakesh Thakur

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेतलं आहे.

गेल्या दोन पर्वात गुजरात टायटन्सचे कर्णधार असलेल्या पांड्याचे मुंबईत पुनरागमन आश्चर्यकारक आहे.

हार्दिकला परत घेण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय चुकीचा ठरू शकतो.

हार्दिक हा सामना विजेता आहे खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम आहे.

हार्दिक पांड्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे हा खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

हार्दिक पांड्याने गोलंदाजी न केल्यास मुंबईचे मोठे नुकसान होईल.

हार्दिक पांड्याचे मुंबई संघात पुनरागमन झाल्याने काही खेळाडू नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे.

हार्दिक पांड्याच्या मुंबईत पुन:प्रवेशानंतर जसप्रीत बुमराहची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय आहे.