अभिषेक शर्माची कमाल, ठरला चौथा भारतीय फलंदाज

11  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाने यूएई विरुद्ध 9 विकेट्सने सामना जिंकला. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात विजय मिळवला.

अभिषेक शर्मा याने यूएई विरुद्धच्या सामन्यात 58 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 30 धावा केल्या. 

अभिषेक शर्मा याने भारताच्या डावातील पहिल्याच बॉलवर सिक्स लगावला. 

अभिषेक शर्मा यासह टी 20i सामन्यात पहिल्याच बॉलवर सिक्स लगावणारा एकूण चौथा भारतीय ठरला. तसेच अभिषेक दुसऱ्या डावातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावणारा पहिलाच भारतीय ठरला. 

रोहित शर्मा पहिल्या डावातील पहिल्या बॉलवर सिक्स लगावणारा पहिला फलंदाज आहे.

रोहित शर्मा याच्यानंतर यशस्वी जयस्वाल यानेही पहिल्या डावातील पहिल्या बॉलवर सिक्स लगावला होता.

विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन पहिल्या बॉलवर सिक्स लगावणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा