टी20 वर्ल्डकपमधील या नियमामुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये!
30 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी आहे.
9 जूनला भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
टी20 वर्ल्डकपमधील एक नियम टीम इंडियाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.नाही तर मोठा फटका बसू शकतो.
टी20 वर्ल्डकपमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू आहे. यात दोन षटकांमधील अंतर हे फक्त 60 सेकंदांचं आहे.
60 सेकंदात दुसरं षटक सुरु झाल नाही तर कर्णधाराला दोन वॉर्निंग दिल्या जातील. त्यानंतर परत चूक केली तर प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा मिळतील.
टी20 फॉर्मेटमध्ये एका एका धावेचं महत्त्व आहे. 5 धावांची पेनल्टी लागली तर टीमच्या पराभवाचं कारण ठरू शकते.
स्टॉप क्लॉक नियम ट्रायल मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरु झाला होतं. एप्रिलपर्यंत चाचपणी झाली आणि आता टी20 वर्ल्डकपमध्ये लागू केला आहे.