कॅप्टन रोहित-विराट आणि राहुल द्रविड यांचा सीएट पुरस्कार कार्यक्रमात सन्मान
22 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाची गेल्या काही काळात उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. रोहितला त्याच्या या कामाची पोचपावती मिळाली आहे.
रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितला त्याच्या या कामगिरीसाठी सीएटच्यावतीने मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक-कर्णधार राहुल द्रविड यांचाही मुंबईत 21 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकर्मात सन्मान, 'द वॉल' यांचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने गौरव
विराट कोहली याला 2024 वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरीसाठी 'टी 20 बॅटर ऑफ द इयर' हा बहुमान
दिग्गज स्पिनर आर अश्विन याचा टेस्ट आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा वनडे बॉलर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान
ओपनर यशस्वी जयस्वाल याचा सीएट टेस्ट बॅटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरव
टीम इंडियाची स्टार ऑलराउंडर दीप्ती शर्मा वूमन्स बॉलर ऑफ द इयर, तर शफाली वर्मा कसोटीतील द्विशतकासाठी खास पुरस्कार