2 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय क्रिकेट संघाचा मोहम्मद शमी याचा 3 सप्टेंबरला 35 वा वाढदिवस आहे. शमीचा 1990 साली यूपीतील अमरोहामधील सहसपूरमध्ये जन्म झाला होता.
मोहम्मद शमी भारताच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. शमीला त्याच्या पहिल्या करारासाठी किती रक्कम मिळाली होती? हे जाणून घेऊयात.
शमी 2005 साली कोलकातामधील डलहौजी एथलेटिक्स क्लबसह जोडला गेला. शमीवर तेव्हा बंगाल क्रिकेट संघाचे माजी सहाय्यक सचिन देबब्रत दास यांचं लक्ष गेलं.
तेव्हा सचिन देबब्रत दास यांनी शमीला क्लब टाऊन कल्बमध्ये एन्ट्री दिली. तेव्हा कल्ब आणि शमी यांच्यात 75 हजार रुपयांचा करार करण्यात आला.
टाऊन कल्बसह जोडल्यानंतर शमीचा राहण्याचा प्रश्न होताच. तेव्हा देबब्रत दास यांनी शमीला त्यांच्या राहत्या घरात आसरा दिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमीचं नेटवर्थ हे 55 ते 65 कोटी रुपयांदरम्यान आहे.
मोहम्मद शमी याने भारताचं कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.