14 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
मोहम्मद सिराज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिराजने इंग्लंड दौऱ्यात चमकदार कामगिरी केली. सिराज भारत-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
सिराजने पाचव्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 9 विकेट्स घेत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
सिराजच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत सर्वांनाच माहित आहे. मात्र सिराजचा खास मित्र कोण आहे? तु्म्हाला माहितीय?
मोहम्मद सिराज याचा तो खास मित्र टीम इंडियात नाही. मग तो मित्र आहे तरी कोण?
सिराजच्या या खास मित्राने सिराजला त्याच्या पडत्या आणि संघर्षाच्या काळात मदत केली. सिराजला कुणीच ओळख नव्हता तेव्हापासून तो सिराजसोबत आहे.
सिराजच्या खास मित्राचं नाव शाहरुख आहे. याबाबत स्वत: सिराजने एका कार्यक्रमात सांगितलं होतं.
हा शाहरुख बॉलिवूड अभिनेताही नाही, तसेच क्रिकेटर शाहरुख खानही नाही. तर हा शाहरुख फक्त नि फक्त सिराजचा खास आणि जिवलग मित्र आहे.