टीम इंडिया चौथ्यांदा अंतिम फेरीत, आतापर्यंतचा इतिहास वाचा

15 November 2023

Created By: Rakesh Thakur

साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकत टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली.

सेमी फायनलमधये न्यूझीलंडसमोर 398 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण किवी संघ 327 धावा करू शकला. 

अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. 

1983 साली कपिल देवच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली होती. हा सामना टीम इंडियाने जिंकला होता.

2003 साली टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

2011 साली टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आणि श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. 

2023 साली पुन्हा एकदा टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.