टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी 20I सीरिजमध्ये वरचढ, पाहा आकडेवारी

28 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया टी 20I सीरिजला 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. 

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील टी 20I मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकदाही टी 20I मालिका गमावलेली नाही.

भारताने ऑस्ट्रेलियात 2007 पासून एकूण 4 टी 20I पैकी 2 मालिका जिंकल्या आहेत. तर 2 मालिका बरोबरीत सोडवल्या आहेत. 

भारताने 2015-16 साली 3-0, त्यानंतर 2020-21 साली ऑस्ट्रेलियाला 2-1 अशा फरकाने पराभूत केलं होतं. 

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या तिन्ही टी 20I मालिका जिंकल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची शेवटची टी 20I मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली होती.

तसेच टीम इंडिया-ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I इतिहासात  5 सामन्यांच्या मालिकेचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

भारताने 7 पैकी 5 वेळा 5 सामन्यांची टी 20I मालिका जिंकली आहे. विंडीजने एकदा पराभूत केलं. तर न्यूझीलंड विरुद्धची मालिका बरोबरीत राहिली आहे.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स