28 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
भारत-ऑस्ट्रेलिया टी 20i मालिकेतील सलामीचा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात असे 4 खेळाडू आहेत ज्यांनी या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत सिक्स लगावलेला नाही.
कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या चौघांना टी 20i क्रिकेटमध्ये सिक्स लगावता आलेला नाही.
कुलदीपने भारताचं 47 टी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र कुलदीपला षटकार लगावता आला नाही.
हर्षित राणा याने अवघे 3 टी 20i सामने खेळले आहेत. हर्षितला सिक्स लगावता आलेला नाही. मात्र हर्षितमध्ये मोठे फटके लगावण्याची क्षमता आहे.
बुमराहला 75 पैकी 8 टी 20i सामन्यांमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली. बुमराह या फॉर्मेटमध्ये सिक्स लगावू शकला नाही.
वरुण चक्रवर्ती याने 24 टी सामने खेळले आहेत. वरुणला फक्त 6 चेंडूच खेळण्याची संधी मिळालीय.