1 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
क्रिकेटमध्ये कमी उंचीमुळे काही अडत नाही हे सचिन तेंडुलकर आणि टेम्बा बावुमा या दोघांनी सिद्ध केलं. मात्र बरेचसे उंचपुरे खेळाडूही आहेत.
या निमित्ताने भारताच्या 5 उंच खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. भारताच्या सर्वात उंच खेळाडूची कारकीर्द ही अवघ्या 3 सामन्यांचीच ठरली.
पंकज सिंह हा भारताचा सर्व उंच खेळाडू आहे. पंकजची उंची 6 फूट 6 इंच इतकी आहे. पंकजने भारताचं 2 कसोटी आणि 1 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं.
माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविल्ला भारताकडून 10 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळला. अभयची उंचीही 6 फूट 6 इंच इतकी आहे.
भारतासाठी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा दिग्गज वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची उंची 6 फूट 5 इंच इतकी आहे.
माजी फिरकीपटू राहुल शर्मा याची उंची 6 फूट 4 इंच इतकी आहे. राहुलने भारताचं 4 एकदिवसीय आणि 2 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.
माजी फिरकीपटू निलेश कुलकर्णी याची उंचीही 6 फूट 4 इचं इतकी आहेत. तसेच वेंकटेश अय्यर याची उंचीही निलेश कुलकर्णी यांच्या इतकीच आहे.