भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात रविवारी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

18 November 2023

भारतीय संघ अंतिम सामन्याच्या तयारीला लागला आहे. टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर कसून मेहनत करत आहे.

अंतिम सामन्याच्या पूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी घातलेल्या जर्सीवरुन राजकारण सुरु झाले आहे. 

टीम इंडियाच्या खेळाडूंनी भगव्या रंगाची जर्सी घातली आहे. त्यावरुन ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

भाजप सर्वत्र भगवेकरण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

ममता बॅनर्जीच्या आरोपावर भाजपने उत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांना संपूर्ण बंगाल निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा करायचा आहे.

बीजेपी नेता राहुल सिन्हा यांनी तिरंगात भगवा रंग का आहे? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना केला आहे.