प्रिन्स शुबमनची विक्रमी खेळी, विराटची बरोबरी, सचिनचा रेकॉर्ड ब्रेक

11 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

शुबमन गिल याने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक ठोकलं. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं.

शुबमनने 196 चेंडूत नाबाद 129 धावा केल्या. शुबमनने या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार लगावले.

शुबमनने इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी  स्वीकारली.  त्यानंतर शुबमनचं हे 7 सामन्यांमधील 5वं शतक ठरलं आहे. 

शुबमनने यासह एका वर्षात सर्वाधिक कसोटी शतकं लगावण्याबाबत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. तर सचिनचा रेकॉर्ड ब्रेक केला.

सचिनने 1997 साली कर्णधार म्हणून 4 शतकं झळकावली होती. तर आता शुबमनने या पाचव्या शतकासह सचिनचा विक्रम मोडीत काढला.

विराटने 2 वेळा एका वर्षात कर्णधार म्हणून 5 कसोटी शतकं झळकावली आहेत. विराटने 2017 आणि 2018 साली हा कारनामा केला. 

टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमनला या मालिकेत शतक करुन विराटचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी