टीम इंडियाचा 'मिस्टर 360' सूर्यकुमार यादव याचे काही खास रेकॉर्ड्स

17  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

सूर्यकुमार यादव टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. 

सूर्याने आतापर्यंत भारतासाठी कर्णधार आणि फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सूर्याच्या काही खास रेकॉर्ड्सबाबत जाणून घेऊयात.

सूर्यकुमार टी 20I क्रिकेटमध्ये 167.30 च्या सर्वाधिक स्ट्राईक रेटने  2 हजार धावा करणारा फलंदाज आहे.

सूर्या एका वर्षात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. सूर्याने 2022 साली सर्वाधिक 68 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता.

सूर्या टी 20I क्रिकेटमध्ये घराबाहेर 3 शतकं करणारा टीम इंडियाचा एकमेव आणि एकूण तिसरा फलंदाज आहे. सूर्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल आणि फिल सॉल्ट यांनीही अशीच कामगिरी केलीय. 

सूर्यकुमार टी 20I क्रिकेटमध्ये सर्वात कमी 49 डावांत 100 षटकार लगावणारा फलंदाज आहे.

सूर्यकुमार टी 20I क्रिकेटमध्ये 11 संघांविरुद्ध मॅन  ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. 

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत