चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला संधी नाही

18  जानेवारी 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 18 जानेवारीला भारतीय संघ जाहीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडून खेळाडूंच्या नावाची घोषणा

रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचं नेतृत्व करणार, तर शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

निवड समितीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काही मोठे निर्णय घेतले, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादवला संधी मिळाली नाही

सूर्या आयसीसी वनडे आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता

सूर्यकुमार वनडे वर्ल्ड कप फायनलनंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही

दरम्यान सूर्यकुमार 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे