करुण नायरला बांग्लादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार? स्टार फलंदाज 7 वर्षांपासून प्रतिक्षेत
27 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा स्टार फलंदाज 7 वर्षांपासून संधीच्या प्रतिक्षेत, करुण नायर अखेरचा सामना 2017 साली खेळला
करुणचं विराटच्या नेतृत्वात 2016 साली इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण, पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये 303 धावांची त्रिशतकी खेळी
करुण नायर कसोटीत त्रिशतक करणारा सेहवागनंतर दुसराच भारतीय, करुण आपल्या पहिल्या कसोटी शतकाचं रुपांतर त्रिशतकात करणारा तिसराच
करुणला त्रिशतकानंतर 3 सामन्यांमध्ये संधी, मात्र तिथे करुण अपयशी, तेव्हापासून कमबॅक नाहीच
करुण नायरचा महाराजा ट्रॉफीमध्ये धमाका, आतापर्यंत 190 च्या स्ट्राईक रेटने 49 च्या सरासरीसह 346 धावा
भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला काही दिवसात सुरुवात, करुण नायर कमबॅकसाठी सज्ज
करुण नायरला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत संधी द्या, नेटकऱ्यांची मागणी