16 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात युवा फलंदाजाने विस्फोटक शतक ठोकलं. हा फलंदाज कोण आहे? जाणून घेऊयात.
यश धुल याने डीपीएल 2025 मधील 5 डावांमध्ये 2 वेळा शतक ठोकत धमाका केला आहे.
सेंट्रल दिल्ली किंग्सकडून खेळताना यशने 16 ऑगस्टला नॉर्थ स्ट्रायकर्स विरुद्ध 49 बॉलमध्ये झंझावाती शतक केलं.
ओपनिंगला आलेल्या यशने 51 बॉलमध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. यशने याआधी याच संघाविरुद्ध 101 धावांची खेळी केली.
यशने अशाप्रकारे या हंगामातील 5 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह आतापर्यंत एकूण 292 धावा केल्या आहेत. यशची सरासरी ही 146 इतकी आहे.
यशने त्याच्या नेतृत्वात 2022 साली भारतीय संघाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता.
यशने त्यानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत धमाका केला. तसेच यशला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळण्याची संधी मिळाली.