0,0,0, विराट  कोहलीसाठी हा कॅप्टन सर्वात अनलकी

24 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिरोवर आऊट झाला. 

विराटने पर्थमध्ये 8 तर एडलेडमध्ये 4 चेंडूंचा सामना केला. मात्र विराटला धावांचं खातं उघडता आलं नाही. 

विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श हा अनलकी आहे. 

मिचेलने ज्या सामन्यांत नेतृत्व केलंय विराट त्या सामन्यांत धावांचं खातं उघडण्यात अपयशी ठरलाय.

मार्शने नेतृत्व केलेल्या तिन्ही सामन्यांत विराट झिरोवर आऊट झालाय.  2024 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही असंच झालं होतं.

विराटने तिन्ही फॉर्मेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यात. मात्र विराटला गेल्या 10 पैकी 7 डावांत दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

तसेच विराटची एकदिवसीय कारकीर्दीत सलग 2 वेळा शून्यवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा-अंतिम सामना सिडनीत होणार आहे. विराटचा हा सिडनीतील शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे विराटकडून चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे.

'झी मराठी अवॉर्ड्स 2025'मध्ये या अभिनेत्रीने जिंकले 4 पुरस्कार