फक्त शतकी खेळीवर 56 सामने जिंकवणारा फलंदाज! जाणून घ्या

19 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने जिंकलेल्या सामन्यांमध्ये 56 शतकं झळकावली आहेत. 

विराट कोहली धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 80 शतकं ठोकली आहेत.

जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 55 शतकं ठोकली आहे. 

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकली आहेत. यात 53 विजयी शतकं आहेत. 

हाशिम आमला चौथ्या स्थानी असून त्याने 40 विजयी शतकं ठोकली आहेत. 

रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर असून त्याने 40 विजयी शतकं ठोकली आहेत.