सूर्यकुमार टी 20i कॅप्टन म्हणून किती यशस्वी? पाहा आकडेवारी

9 सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

सूर्यकुमार यादव टी 20 आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. सूर्याची आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे

रोहित शर्माने भारताला 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्याला टी 20i कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.

तेव्हापासून सूर्याने भारताचं सार्थपणे टी 20i सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. 

सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावली नाही.

सूर्याने आतापर्यंत भारताचं 22 टी 20i सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे.

सूर्याने भारताला 22 पैकी 17 सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 1 मॅच टाय झाली. 

तसेच रोहित शर्मा टीम इंडियाचा टी 20i मधील सर्वात यशस्वी  कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने 62 पैकी 49 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा