कानपूर कसोटीत चाहत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्राण्यांवर!
27 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि बांगालदेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये सुरु आहे.
या स्टेडिममध्ये माकडांचा प्रचंड उच्छाद आहे. खाण्यापिण्याचा वस्तू हिसकवण्याचा घटना घडू शकतात.
संभाव्य प्रकार लक्षात घेत वानरांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांचे मालकही यावेळी मैदानात आहेत.
ग्रीन पार्क मैदानात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात माकडांचा उच्छाद टाळण्यासाठी यापूर्वीही वानरांची मदत घेतली गेली आहे.
माकडांचा सर्वाधिक धोका हा कॅमेरामनना असतो. कारण स्टँडमधून शूट करतात कधी हल्ला करतील सांगता येत नाही.
भारत आणि बांग्लादेश कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 गडी गमवून 107 धावा केल्या आहेत.