IND vs BAN : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियातून जाणार 3 खेळाडू
24 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे. सामन्यापूर्वी 3 खेळाडू संघ सोडून जाण्याची शक्यता आहे.
सरफराज खान, विकेटकीपर ध्रुव जुरेल आणि डावखुरा गोलंदाज यश दयाल हे 3 खेळाडू आहेत. त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं.
दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग 11 मध्ये निवडलं नाही तर संघ सोडून जाण्याची शक्यता आहे.
तिन्ही खेळाडूंची निवड इराणी चषकासाठी केली गेली आहे. हा सामना 1 ऑक्टोबरला मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना होणार आहे.
ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांची निवड रेस्ट ऑफ इंडियात झाली आहे. सरफराज खान मुंबईकडून खेळताना दिसेल.
बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, या तिघांची निवड प्लेइंग 11 मध्ये झाली नाही तर इराणी कपसाठी रिलीज केलं जाईल.