टीम इंडियात परतण्याची जराही आशा नाही! सरफराज असं का म्हणाला?
16 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
इंग्लंडविरुद्ध कसोटी डेब्यू करणाऱ्या भारतीय फलंदाज सरफराज खानने मोठं विधान केलं आहे.
सरफराज खानने सांगितलं की, येणाऱ्या बांग्लादेश कसोटी मालिकेत निवड होईल असं वाटत नाही.
सरफराज खानचं टीम इंडियात निवड कठीण आहे. कारण केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत सारखे खेळाडू परतले आहेत.
सरफराज खानने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. यात 50 पेक्षा जास्त सरासरीने 200 धावा केल्या. यात तीन अर्धशतक ठोकले.
बांगलादेशविरुद्ध सप्टेंबर महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या संघाची निवड पहिल्या आठवड्यात होईल.
बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर, तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला होईल.
सरफराज खान बुची बाबू स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करत आहे. त्याने यात चांगली कामगिरी केली तर निवड होऊ शकते.