टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर, हे संघ होणार बाहेर

12  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे 12 संघ स्पर्धेतून आऊट होणार आहेत.

अ गटातून भारत आणि अमेरिकेचं सुपर 8 फेरीचं गणित सुटू शकतं. तर पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंडचं खूपच कठीण आहे. 

ब गटातून ऑस्ट्रेलियाने क्वॉलिफाय केलं आहे. तर स्कॉटलँडला सुपर 8 फेरीची संधी अधिक आहे. तर इंग्लंड, नामिबिया आणि ओमानचा पत्ता कापला जाईल. 

क गटातून अफगाणिस्तान वेस्ट इंडिज हे संघ टॉपला आहेत. तर न्यूझीलंड बाहेर जाऊ शकते. युगांडा, पीएनजी असेच बाद आहेत. 

ड गटातून दक्षिण अफ्रिकेने क्वॉलिफाय केलं आहे. तर बांगलादेश-नेदरलँडमध्ये टफ फाईट आहे. श्रीलंकेचा पत्ता कट झाला आहे.

साखळी फेरीतून बाद झाल्यानंतर चार कर्णधारांवर गच्छंतीची टांगती तलवार आहे. यात बाबर आझम, केन विल्यमसन, हसरंगा आणि बटलरचं कर्णधारपद जाऊ शकतं.